नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील, संजय राऊतांची खोचक टीका
* नारायण राणे हे पराभवाचा चौकार मारतील. आम्ही आधी मुंबई आणि कोकणात त्यांचा पराभव केला. आता ते मोठ्या लढाईत उतरले आहेत. मात्र, विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये विजयी होतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा घेतल्या आहेत, आता ते मुंबईत येत आहेत, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर राऊतांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी पेडर रोडला आणि अमित शाह यांनी बोरिवलीत घर भाड्याने घेतले आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांना इथेच राहायचे आहे, त्यांना दुसरं काय काम आहे. पण तुम्ही कितीही खुंट्या ठोका, शिवसेना तुमचा पराभव करेल. मोदींना मुंबईत येऊ द्या. तरीही मुंबईत ठाकरे गटच जास्त जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.www.konkantoday.com