चिपळूण न.प.ची अर्धशतक पार केलेली इमारत आता मोजतेय अखेरची घटका
चिपळूण येथील नगरपरिषदेची अर्ध शतक पार केलेली इमारत आता अखेरची घटका मोजत आहे. तिचे काम ढासळत चालले असून पिलरना धोका निर्माण झाला आहे. तरीही तिचा काही प्रमाणात वापर सुरू असल्याने दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.नगर परिषदेची स्थापना १ डिसेंबर १८७६ साली झाली. त्यानंतर १९४७-४८ साली पहिली इमारत तर १९७४ साली दुसरी इमारत बांधण्यात आली. पहिली इमारत दगडी बांधकामाची असल्याने तिला ७७ वर्ष झाली तरी ती तग धरून आहे. तिला अद्याप कोणताही धोका नसून आणखी काही वर्षे ती तंदुरूस्त राहणार आहे. मात्र ज्या इमारतीला ५० वर्षे झाली आहेत ती इमारत मात्र आता अखेरची घटका मोजत आहे. मात्र ज्या इमारतीमधून शहराच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी दिला जातो, त्याच इमारतीच्या देखभाल दुरूस्तीकडे लक्षच दिले गेले नसल्याचे तिच्या सध्याच्या अवस्थेवरून स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षापासून एका इमारतीचा काही भाग ढासळू लागला असून पावसाळ्यात भिंती ओल्या होताना दिसतात. तसेच अनेक विभागात पावसाळ्यात मोठी गळती लागते. सभागृहाची अवस्था तर त्यापेक्षाही बिकट झाली आहे.www.konkantoday.com