चिपळूण तालुक्यातील तळसर येथील मंदिराच्या दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला

चिपळूण तालुक्यातील तळसर येथील शिवमंदिर व ग्राममंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. या चोरट्याने दोन मंदिरांच्या दानपेटीतून रोख रक्कम व दीड हजार रुपयांसह सीसीटीव्ही हार्डडिस्कचे मशिनही चोरून नेले. या प्रकरणी अलोरे-शिरगांव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाख करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सुरेश शिवराम निकम (तळसर) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेया माहितीनुसार ४ एप्रिल सायंकाळी ५ ते ५ एप्रिल सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जंगलमय भागामध्ये असलेल्या शिवमंदिराच्या पाठिमागील रूमच्या दरवाजाला लावलेले कुलूप कडी-कोयंडा उचकटत अज्ञात चाोरट्याने आत प्रवेश केला. तसेच दानपेटी फोडून त्यातील १ हजार रुपये लांबवले. त्याचबरोबर ५ हजार किंमतीची सीसीटीव्ही हार्डडिस्कची मशिन चोरून नेली. तसेच ग्राममंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम ५०० रुपयेही लांबविले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button