
एसीचे लोकलचे तिकिट कमी करा नाही तर लोकल फेऱ्या वाढवा
* लोकलच्या गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. यावर उपाय म्हणून गर्दीचे व्यवस्थापन केले पाहिजे. आवश्यक ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली पाहिजे. लोकल फेऱ्या वाढविल्या पाहिजेत.फलाटांवर उपाययोजना केल्या पाहिजेत. कार्यालयीन वेळांमध्ये बदल केले पाहिजे, अशा उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात यावा, या मागण्यांकडे प्रवाशांनी लक्ष वेधत रेल्वेच्या कारभारावर टीका केली आहे. एसीचे लोकलचे तिकिट कमी करा नाही तर लोकल फेऱ्या वाढवा, अशी मागणीही रेल्वे प्रवाशांनी केली आहेwww.konkantoday.com