
संगमेश्वर जवळ एस टी आणि मिनी बसची समोरासमोर भीषण धडक अपघातात अनेक जण जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि मिनी बस चा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत
रत्नागिरी -चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरी च्या दिशेने जाणारी मिनी बस मध्ये कुरधुंडा आणि ओझरखोल दरम्यान समोरासमोर टक्कर झाली या अपघात अनेक प्रवासी जखमी झाले असून जखमी लोकांचा आकडा स्पष्ट झालेला नाही
जखमीना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मिनी बस चालक हे गाडीच्या कॅबिन मध्ये अडकले होते त्यांना अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.




