अवजड वाहतूक रोखण्यासाठी उभारण्यात आलेले कशेडी बोगद्यालगतचे हाईट खांब उखडले

मुंबई-गोवा महामार्गावीरल कशेडी बोगद्यातून दुतर्फा मार्गस्थ होणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राने उभारलेले हाईट खांब अवघ्या दोन दिवसातच उखडल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कशेडी बोगद्याातून दुतर्फा वाहतूक केवळ हलक्या वजनांच्या वाहनांसाठीच असताना देखील अवजड वाहने मार्गस्थ होत असल्याने अन्य वाहनचालकांतील गोंधळ कायमच आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने या बाबीकडे अद्यापही फारसे गांभीर्याने लक्ष न दिल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी कायमच आहे.उन्हाळी सुटी हंगामासह लोकसभेच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र दिनापासून कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक खुली झाली आहे. मात्र वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ अजूनही कायमच आहे. अवजड वाहने दोन्ही बाजूने मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग उदभवून वाहतूक कोंडी देखील होत आहे. अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलिसंनी पोलादपूर हद्दीतील भोगाव व तालुक्यातील खवटीनजिक अनुसया हॉटेलजवळ हाईट खांब उभारण्याचा अवलंब केला.बोगद्यापासून काही अंतरावर उभारण्यात आलेले हाईट खांब अवघ्या दोन दिवसातच उखडले आहेत. रात्री अथवा पहाटेच्या सुमारास पोलीस नसल्याची संधी साधून अवजड वाहनांची वाहतूक करणार्‍या चालकांनी हाईट खांबच उखडल्याचे समोर आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button