अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे सोपवण्याची मागणी

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. याचिकेची दखल घेत न्यायालयाने घोसाळकर कुटुंबियांना संबंधित सीसीटीव्ही फुटेज दाखवा असे निर्देश पोलिसांना दिलेअभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिस नोऱ्हानो याने गोळ्या झाडून हत्या केली होती. मॉरिसने ज्या पिस्तूलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तुल मॉरिसचा खासगी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते. अमरेंद्र याच्या जवळ पिस्तुल असणे आवश्यक होते मात्र या प्रकरणात त्याचा हलगर्जीपणा समोर आला त्यामुळे शस्त्रास्त्र कायदा २९ (ब) व ३० अंतर्गत त्याला पोलिसांनी अटक केली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button