
*अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा बनवले-खासदार संजय राऊत
_बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा बनवले आहे, अशी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या अनुषंगाने भाष्य केले.बारामतीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा पराभव करुन मोदी आणि शाहांना दाखवून द्यायचं आहे की, आम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांनी पैशाच्या ताकदीवर आणि तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला. पण तसं होणार नाही. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. या लढाईत सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. भाजपचे अनेक विद्यमान खासदार पुन्हा लोकसभेत दिसणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.www.konkantoday.com