स्वतः शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, फडणवीस साहेबांचं साधारण हेच धोरण -शिवसेना खासदार संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा भूसंपादनाचा तब्बल 800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.दोन दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लबोल केला. स्वतः शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, फडणवीस साहेबांचं साधारण हेच धोरण दिसत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, उद्धव ठाकरेंनी आपलं मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा कट रचला होता, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. तुम्ही आमचे 40 आमदार का फोडले ते सांगा त्याच्यावर का बोलत नाहीत. तुम्ही शरद पवारांचे चाळीस आमदार फोडले, आमचे 40 आमदार फोडले. स्वतः शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, फडणवीस साहेबांचं साधारण हेच धोरण दिसत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. स्वतः शेण खा.. खा… खायचं, शेणात तोंड बुडवायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा हे त्यांचे धोरण आहे, असे म्हणत राऊत यांनी शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका केली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button