शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी लढत असलेल्या १९ जागांवर फारशी चांगली कामगिरी करण्याची शक्यता नसल्याचे सर्वेत उघड
* उद्या राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी काही मतदारसंघात मतदान होत आहेत. यातच आलेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यात २०१९ मध्ये जिंकलेल्या ४८ पैकी ४१ जागा यंदा कोणत्याही सर्वेक्षणातून एनडीएला मिळताना दिसत नाहीय.शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी लढत असलेल्या १९ जागांवर फारशी चांगली कामगिरी करण्याची शक्यता नाही. मात्र भाजपची कामगिरी चांगली राहिल असे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात महायुतीत चिंतेचे वातावरण तयार झाले आहेत.दरम्यान, राज्यात झालेल्या पक्ष फुटीचा फायदा हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे काही सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. यातच दोन्ही नेत्यांनी राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रचार सभा घेतल्या आहेत.www.konkantoday.com