रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त 45 हजार कर्मचाऱ्याचा लोकसभा उमेदवार मा. नारायण राणे यांना पाठिंबा
भारतात निवृत्त कर्मचारी योजना १९९५ या योजनेचे ७८ लाख पेन्शनर असून देशात १९ कोटी नोकरदार आहेत. रत्नागिरी-सिधुदुर्ग जिल्ह्यात निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या ४५ हजार असून रत्नागिरीत ३३ हजार आणि सिंधुदुर्गात १२ हजार पेन्शनर आहेत. राष्ट्र प्रथम याला निवृत्त कर्मचारी १९९५ पेन्शनरांनी प्रथम पसंती देऊन झालेल्या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मा. श्री. नारायण राणे साहेब यांना महायुतीची उमेदवारी मिळाली असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील ई.पी.एस. पेन्शनर यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. तसेच महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना दिले त्याप्रसंगी सतेज नलावडे जिल्हा सरचिटणीस,अशोक वाडेकर, अविनाश पावसकर, निलेश आखाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com