रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जि. प. च्या 1 हजार 500 शाळा मतदान केंद्र म्हणून निवडल्या
रत्नागिरी जिल्ह्यातही जि. प. च्या शेकडो शाळा बंद झाल्या आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे शासनाला त्या अडगळीत पडलेल्या शाळांची आठवण झाली आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जि. प. च्या 1 हजार 500 शाळा निवडणूक मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आल्या आहेत. यातील 30 पेक्षा जास्त बंद शाळाही निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे 30 शाळा लोकसभा मतदारसंघातील 7 मे रोजी मतदानाच्या दिवशी पुन्हा उघडणार आहेत. त्यापैकी अनेक शाळांची पडझड झाली आहे. त्या शाळा दुरुस्तीसह रंगविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्या आहेत. 2019 नंतर 5 वर्षांत शाळा बंद असल्यामुळे दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे त्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या शाळांची गरज मतदानाच्या दिवशी आहे.मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकार्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जि. प. च्या 1 हजार 500 शाळा मतदान केंद्र म्हणून निवडल्या आहेत. www.konkantoday.com