चाकरमान्यांना सुट्टी नसल्याने चाकरमान्यांची मते होणार कमी
मुंबई व कोकणातील लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा वेगवेगळ्या असल्याने याचा फटका कोकणातील उमेदवारांना बसणार आहे. यामुळे मुंबईतील चाकरमान्यांच्या मतदानावर भिस्त असणारे कोकणातील सर्वच उमेदवार यावेळी गॅसवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.रायगड व रत्नागिरी येथील लोकसभेची निवडणूक ७ मे रोजी होणार आहे. तर मुंबई येथील लोकसभेची निवडणूक २० मे रोजी होणार आहे. यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे ७ मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई येथे २० मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातील बहुतांशी चाकरमानी हा मुंबई येथे नोकरीला आहे. ते दरवर्षी मतदानासाठी कोकणात येत असतात शिवाय वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्थाही करण्यात येते. यंदाही कोकणातील उमेदवारांकडून त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ७ मे रोजी मुंबईत सुट्टी जाहीर झालेली नसल्याने अनेकजण कोकणात मतदानाला येण्यास नाखुश असल्याचे समजते. www.konkantoday.com