कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील 660 मेगावॉटचा संच क्रमांक आठ तांत्रिक कारणाने बंद पडला
* राज्यभरात वातावरणाचा पारा वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या गर्मीमुळे सर्वत्र पंखे, वातानुकुलीत यंत्रासह विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे यासाठी विजेची मागणी देखील वाढली आहे.पण राज्यात वीज निर्मिती करणाऱ्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील 660 मेगावॉटचा संच क्रमांक आठ तांत्रिक कारणाने शनिवारी (ता. 04 मे) बंद पडला आहे. ज्यामुळे राज्यातील वीज निर्मितीचा टक्का घसरला आहे. तर वीज निर्मितीची चिंताही सतावू लागली आहेwww.konkantoday.com