केंद्र सरकारचा 30,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार
तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल किंवा येत्या काही दिवसांत ती खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 30,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे.सरकार सध्याच्या 18 टक्के जीएसटी दरावरून 12 टक्के करण्याचा विचार करत आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, आरोग्य विमा अधिक परवडणारा आणि आकर्षक बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सध्या 30 हजार रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कुटुंबातील चार सदस्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते. www.konkantoday.com