किक्रेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुण्यातील लोहगाव भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. किक्रेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शंभू कालिदास खांदवे असे या मुलाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यातील लोहगाव भागात शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे त्यांच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. किक्रेट खेळत असताना समोरून येणारा चेंडू शंभूच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. काही वेळानंतर तो उठून उभा राहिला. परंतू वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button