
कामाची देयकेच मिळत नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटदार उद्यापासून बेमुदत संपावर
शासनाची सर्व विभागातील विकासाची कामे करणारे लहान मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार, स्थापत्य अभियंता, छोटे विकासक यांचा समावेश असलेले कंत्राटदार ७ मे पासून बेमुदत संपावरच जाणार आहेत. कामाची देयकेच मिळत नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कामे करणार नसल्याचा एकमुखी निर्णयही कंत्राटदारांनी घेतला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास जलजीवन मिशन, जलसंधारण, ग्रामविकास आदी विकासकांची कामे करणार्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देण्यात यावी, कंत्राटदार यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणार्या व्यावसायिकांना वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने आर्थिक पिळवणूक होत असून कंत्राटदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळच आली आहे. सर्व विभागाकडील विकासाची कामे मंजूर करण्याअगोदरच कामास निधीची उपलब्धता असल्याशिवाय निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्ययात येवू नये, अशी मागणी कंत्राटदारांची आहे. www.konkantoday.com