
आरोग्य प्रशासन आताच हतबल, गणेशोत्सवाचे नियोजन काय? माजी आ. हुस्नबानू खलिफे यांचा सवाल
लाडक्या गणेशोत्सव सणासाठी हजारो चाकरमानी नजिकच्या काळात जिल्ह्यात दाखल होणार असताना कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या या काळात प्रशासनाची वैद्यकीय सुविधांची काय तयारी आहे याचे उत्तर शून्य असल्याची तिखट प्रतिक्रिया माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची वाढती रूग्ण संख्या पाहता आरोग्य प्रशासनावर ताण पडलेला दिसून येत आहे. मग जेव्हा हजारो चाकरमानी गणपती उत्सवासाठी जिल्ह्यात येणार आहेत त्याला अवघा एक महिना उरला असताना जिल्हा प्रशासनाने आरोग्यविषयक सुविधांची कोणती पूर्वतयारी केलेली आहे याची माहिती जनतेला द्यावी असे आवाहन सौ. खलिफे यांनी केले आहे.
www.konkantoday.com