
वणव्यात ५०५ काजू झाडे खाक
चिपळूण तालुक्यातील खडपोली-तळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी उदय बापट यांची काजूची संपूर्ण बाग शुक्रवारी दुपारी लागलेल्या वणव्यात जळून खाक झाली. वणवा वेळीच आटोक्यात आल्याने दुर्दैवाने या घटनेतून शेतघर बचावले.उदय बापट यांनी साडेपाच एकरमध्ये ९ वर्षापूर्वी लागवड केलेली ४७५ काजू कलमे व ३० गावठी काजू रोपे दुपारी लागलेल्या वणव्यात जणून खाक झाली. बाजूच्या जागेतून आलेल्या वणव्यामुळे ही दुर्घटना घडली. सुदैवाने या जागेत असलेले शेत घर व पाणी टाकी वाचली.www.konkantoday.com