
कासवांच्या पाठीवर सॅटेलाईट टॅगिंग यंत्र लावून सोडले समुद्रात गुहागर समुद्र किनाऱ्यावर उपक्रम
गुहागर : ऑलिव्ह रिडले कासवांच्या मादीने अंडी घातल्यानंतर त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट टॅगिंगसाठीचे यंत्र लावण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. गुहागरच्या समुद्रावर हा उपक्रम राबविण्यात आला. वन्यजीव अभ्यासक डॉ. सुरेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले.
यावेळी कांदळवन कक्ष मुंबईचे अप्पर प्रधान वनरक्षक डॉ. विरेंद्र तिवारी, उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनविभागाचे अधिकारी दिलीप खाडे, सचिन निलख, राजश्री कीर, राजेंद्र पाटील, तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, रामदास खोत, संतोष परशेट्ये, अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, नीलेश बापट, संजय भोसले व हृषिकेश पालकर, मोहन उपाध्ये, अभिनय केळस्कर आंजर्ले, यांच्यासह कासवप्रेमी उपस्थित होते.