
रिक्षा संघटनेचा निवडणुकीवरील बहिष्कार सध्या स्थगित, निवडणुकीनंतर निर्णय घेणार
शासनाच्या मुक्त रिक्षा परवानामुळे अडचणीत आलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी जिल्ह्यात होणार्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा सध्या स्थगित करण्यात आला आहे. यासंदभांत रत्नागिरी जिल्हा प्रवासी वाहतूक संघटना व जिल्हा प्रशासन तसेच परिवहन अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र आचारसंहितेनंतर याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तर पुढे होणार्या प्रत्येक निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला.www.konkantoday.com