बिग बॉस फेम कलावंत अभिजीत बिचुकले सातारा मतदारसंघापाठोपाठ कल्याण मतदारसंघातही
वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम कलावंत अभिजीत बिचुकले यांनी सातारा मतदारसंघापाठोपाठ कल्याण मतदारसंघातही (l लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये कल्याण मतदारसंघात मुख्य लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो असल्याचं सांगून बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. साताऱ्यात मतदान झाल्यावर पुढचे 13 दिवस आपण कल्याण मतदारसंघात ठाण मांडून बसणार असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.www.konkantoday.com