
पाणी टंचाई असताना देखील कर्ला गणेशस्टॉप वस्तीत पाण्याचा अपव्यय
रत्नागिरी शहरवासियांवर सध्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ आली आहे. अशातच नगर परिषद हद्दीतील कर्ला गणेशस्टॉप (डागवाडी) येथे नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या अर्धवट कामामुळे गुरूवारी जणू पाण्याचे पाट वाहिले. मोठ्या प्रमाणात तेथील वस्तीच्या पाखाडीतून पाण्याचा जोरदार खळखळाट पाहून नागरिक चांगलेच अवाक झाले.रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातील पाणीसाठा दिवसागणिक आटू लागला आहे. प्रचंड तापमानाचा फटका पाणीसाठ्यालाही बसला आहे. त्यामुळे सध्या धरणात ४५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे नागरिकांना काटकसरीने पाणीवापर करण्याची वेळ आली आहे. त्यातच कधी कधी काही भागात होणारा कमी दाबाने पाणीपुरवठा नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.www.konkantoday.com