
देवरूख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू
देवरूख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या सांबराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.देवरूख-संगमेश्वर हा मुख्य मार्ग असून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. दोन दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना सांबर या वन्यप्राण्याला अज्ञात वाहनाची धडक बसली होती. यामध्ये हे सांबर जखमी झाले होते. मार्गालगत हे सांबर पडून होते. हा प्रकार पहाटे ५.३० च्या सुमारास घडला होता. याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. यानुसार वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जावून जखमी सांबरावर उपचार सुरू केले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान या सांबराचा मृत्यू झाला. www.konkantoday.com