दारूचे व्यसन असलेल्या तरूणाची आत्महत्या
दारूचे व्यसन असलेल्या तरूणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी चिपळूण तालुक्यातील वीर येथे घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष देमाजी डिंगणकर (४०, वीर, देवपाटवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष डिंगणकर यांना दारूचे व्यसन होते. १ मे रोजी सकाळी ९ ते २ मे रोजी दुपारी ३.३० वाजता तालुक्यातील वीर-देवपाटवाडी, रेवघेवडेवाडी येथे राहत्या घरी दारूच्या नशेत लोखंडी भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.www.konkantoday.com