
दापोली तालुक्यातील मुरूड बैलगाडी स्पर्धेत ओमकार आरेकर प्रथम
दापोली तालुक्यातील येथील मुरूड तुळशीआळी भंडारवाडी येथील बालमित्र मंडळाच्यावतीने आयोजित वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त आयोजित बैलगाडी स्पर्धेत सालदुरे येथील ओमकारच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत १५ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यात सालदुरे येथील ओमकार आरेकर प्रथम, पाळंदे येथील विजय तवसाळकर द्वितीय, तर आंजर्ले येथील संतोष मळेकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव वराडकर, उपाध्यक्ष निनाद पुसाळकर, रूपेश वराडकर, शुभम महाडीक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सभासदांनी मेहनत घेतली. www.konkantoday.com