
*गोळप येथील बागेत नेपाळी भावांच्या खुना प्रकरणी शेजारील बागेत काम करणाऱ्या नेपाळी आरोपीला अटक
रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील गाेळप मुसलमानवाडी येथे दाेन नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या दाेन भावांच्या खूनप्रकरणी पाेलिसांनी गाेळप येथे आंबा बागेत काम करणाऱ्या एक गुराख्याला शुक्रवारी अटक केली आहे. सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (५८, रा. टिकापुर, जि. कैलाली, नेपाळ) असे त्याचे नाव आहे. हे तिघे जण एकत्र दारू प्यायला बसले असतानाच झालेल्या वादावरून आई वरून शिवी घातल्याने हा खुनाचा प्रकार घडला असल्याचे कळते तत्कालीक कारणातून हा खून केल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री (७२), भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री (६७, दाेघेही रा. लम्की चुहा, चौरीपुर, कैलाली, नेपाळ) या दाेघांचा २९ एप्रिल राेजी मध्यरात्री खून करण्यात आला हाेता. ३० एप्रिल राेजी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी आंबा बागायतदार मालक मुसद्दिक मुराद मुकादम यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार पूर्णगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.www.konkantoday.com