किरण सामंत आता राजापूर-लांजा -साखरपाकडे लक्ष केंद्रीत करणार
कोकणातील राजकारणातील किंगमेकर म्हणून ख्याती असलेले किरण सामंत यांच्या रत्नागिरीतील कार्यालयावरील उतरवण्यात आलेल्या फोटो बॅनरची चर्चेने येथील राजकारण ढवळून निघाले. रत्नागिरीतील राजकारणाला नवी कलाटणी मिळणार असल्याचे बोलले जात होते. पण त्या चर्चेच्या विषयावर किरण सामंत यांनी आपण यापुढे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले.बुधवारी रत्नागिरीतील बॅनर चर्चेनंतर मात्र स्वतः किरण सामंत यांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. उद्योजक किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयावरील फोटो असलेले बॅनर उतरविल्याविषयी त्यांचे बंधू राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मोठ्या भावाच्या कार्यालयात माझा फोटो काढून मोठ्या भावाचा फोटो लावला तर मला त्याचे दुःख असण्याचे कोणतेही काारण नको व कोणाला असूही नये. पण त्यांच्या कार्यालयात आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामुळे माझा फोटो असला काय नसला काय, मी मोठ्या भावाच्या हृदयात कायम राहणे, ही बाब महत्वाची आहे.www.konkantoday.com