संगमेश्‍वर तालुक्यातील सह्याद्री बफर झोनमध्ये पर्यावरण संरक्षणाचे फलक

संगमेश्‍वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील संगमेश्‍वर तालुक्यातील सह्याद्री बफरझोन क्षेत्रामध्ये आंबा घाटात वन विभागाच्यावतीने ठिकठिकाणी वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाचे फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.आंबा घाटामध्ये बसवण्यात आलेल्या या फलकांमध्ये प्लास्टिक तसेच वणव्यापासून पर्यावरण संरक्षण करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. वणव्यापासून पर्यावरणावर वाचवण्यासाठी पर्यटकांनी लक्ष देण्याचे सांगितले आहे. तसेच वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावेत असे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लावलेल्या विविध फलकांद्वारे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी फलक लावूनही वणवे लागल्याचे दिसत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button