पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवरील एका दुकानाला काल संध्याकाळी लागली आग, प्रवाशांची पळापळ


पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवरील एका दुकानाला काल संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली. आग लागताच स्टॉलवरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला आणि ५ मिनिटांत आग आटोक्यात आणली.नंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्याही दाखल झाल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीने गोंधळ उडाला होता.

आग लागलेले दुकान ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून चालवण्यात येते. सध्या तिथे मॉन्जिनीस केकशॉप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुकानातील विद्युत उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आगीमुळे स्टेशन परिसरात धुराचे लोट पसरले आणि प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी भीतामुळे स्थानकाबाहेर धावधाव केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button