मुलगा मुलगी असा भेद न करता मुलीने केेले आईचे अंत्यसंस्कार
राजापूर तालुक्यातील गोवळ सारख्या ग्रामीण भागात राहणार्या रचना गणेश जोशी या मुलीने आपल्या आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारासह सर्व विधी स्वतः करत मुलगा मुलगी असा भेद करणार्यांना चपराक दिली आहे.आजही हिंदू समाजात जन्मदात्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थीवाला खांदा देण्यापासून ते पुढील सर्व विधी मुलाने करण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेला छेद देणाररी घटना गोवळ गावी घडली आहे. गोवळ येथील रचना जोशी ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. रचनाचे वडील शेती व मोलमजुरी करतात तर आई घर सांभाळत होती. रचना शिक्षण घेत असतानाच आई आजारी पडली. आईवरील प्रेमापोटी सर्व विधी आपणच करण्याचा निर्णय रचनाने घेतला. www.konkantoday.com