महत्वाचे पुरावे सादर न करणारे निकम हे देशद्रोही असल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

ॲड. उज्ज्वल निकम यांनी मुंबई दहशवादी हल्ला प्रकरणी न्यायालयात जे पुरावे सादर करायला हवे ते सादर केले नाही, असा दावा करून महत्वाचे पुरावे सादर न करणारे निकम हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.वडेट्टीवार गुरुवारी त्यांच्या नागपूर निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ॲड. निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मुंबई हल्ला प्रकरण चर्चेत आले आहे. त्यावरून आरोपप्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. ती गोळी संघाशी (आरएसएस) संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले, अशा देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button