मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संस्थेचा सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हा उपनिबंधक डाॕ शिंदे

रत्नागिरी, दि. 3 (जिमाका) : गृहभेट उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, सहकारी संस्थांचे कर्मचारी वर्ग-प्रतिनिधी यांचा गट / पथक दि. ७ मे पर्यंत संपर्क साधणार आहे. अशा पथकास गृहनिर्माण सहकारी संस्थेत प्रवेशासाठी सहकार्य करावे. आपल्या सभासदांशी सुसंवाद साधण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी तसेच संस्था स्तरावर संस्थेच्या सभासदांची सभा घेवून त्यांना मतदानाचे महत्व पटवून द्यावे व जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपल्या संस्थेचा सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डाॕ. सोपिन शिंदे यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने राबविण्यात येणाऱ्या गृहभेटी उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे, लोकशाही शासन व्यवस्था अबाधित राखण्यासाठी मत देणे किती महत्वाचे आहे, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून, त्यामुळे देशाचा व ओघाने आपला (मतदाराचा) कसा फायदा होणार आहे, याबाबत मतदारांचे प्रबोधन करुन मतदारांमधील उदासीनता दूर करण्याबाबत अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन गृहभेट उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, सहकारी संस्थांचे कर्मचारी वर्ग-प्रतिनिधी यांचा गट / पथक दि. ७ मे २०२४ पर्यंत संपर्क साधणार आहे. अशा पथकास गृहनिर्माण सहकारी संस्थेत प्रवेशाची परवानगी द्यावी. तसेच सदर पथकास आपल्या सभासदांशी सुसंवाद साधण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. तसेच आपणही संस्था स्तरावर संस्थेच्या सभासदांची सभा घेवून त्यांना मतदानाचे महत्व पटवून द्यावे व जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपल्या संस्थेचा सक्रिय सहभाग नोंदवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button