बांधकाम विभाग सेवानिवृत्तांचा ११ जूनला रत्नागिरीत स्नेहमेळावा.
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी मंडळातून विविध पदांवर काम करुन निवृत्त् झालेल्या वर्ग १ ते वर्ग ४ च्या अधिकारी व कर्मचार्यांचा दुसरा स्नेहमेळावा येत्या ११ जून रोजी रत्नागिरीत होणार आहे.यापूर्वी ५ मे २००५ रोजी असा स्नेहमेळावा झाला होता. त्यावेळी सचिव पदावरुन निवृत्त झालेल्या अधिकार्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचार्यांपर्यंत १२१ सेवानिवृत्त सहभागी झाले होते. आता पुन्हा २० वर्षांनंतर असाच स्नेहमेळावा रत्नागिरी येथे आयोजित करण्याचा मानस आहे. निवृत्त भांडार अधीक्षक सुभाष थरवळ यांच्या प्रमुख संयोजनाखाली प्रभाकर रहाटे, शरद कांबळे, विजय जाधव, उदय शिंदे, उदय डाफळे, दिलीप भाटकर, शरद कोतवडेकर, नंदप्रकाश बिर्जे, अविनाश पाटणकर, शिरीष वारंग, सौ. संध्या भोसले, सौ. स्मिता बंडबे यांची अस्थायी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.संपूर्ण दिवसभर चालणार्या स्नेहमेळाव्याचे सहभाग शुल्क वर्ग-१ ते ३ चे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ५०० रुपये तर चतुर्थवर्ग कर्मचाऱ्यांसाठी २०० रुपये आहे. विजय भालचंद्र जाधव (9403505047) यांच्याकडे हे शुल्क गूगल पेद्वारे ३१ मेपर्यंत जमा करून सर्व सेवानिवृत्तांनी आपला सहभाग निश्चित करावा व कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या स्नेहमेळाव्यात राज्यातील नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत तसेच दिल्ली, केरळ, कनार्टक व तामिळनाडूतून अनेक सेवानिवृत्त अधिकारी सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाच्या निवृत्त अधिकारी व कर्मचार्यांनी या आगळ्या वेगळ्या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन आपल्या सेवाकाळातील सहकार्यांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने सुभाष थरवळ (9420042409) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.www.konkantoday.com