ती हेलिकॉप्टर ची दुर्घटना घडण्याअगोदर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यानी त्या हेलिकॉप्टरने काही तासापूर्वी प्रवास केला होता

सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं. याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले. आणि तिथून ते हेलिकॉप्टर महाडला गेलं, तिथून ते बारामतीला जाणार होतं. त्यामुळे एका अर्थानं आणि सुदैवानं जयंत पाटीलही बचावले म्हणता येईल. मुंबईला आल्यानंतर जयंत जयंत पाटील शरद पवारांसोबत जळगावला रवाना झाले.सुषमा अंधारे बारामतीला सु्प्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आयोजित केलेलया महिला मेळाव्याला चालल्या होत्या. या हेलिकॉप्टरमधून मुंबईत जयंत पाटील उतरले आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांना घ्यायला महाडला गेले. महाडहून हे हेलिकॉप्टर बारामतीला जाणार होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं महाडमध्ये झालेल्या या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप आहेत क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. क्रॅश होतानाची दृश्यं समोर आली आहेत. सुदैवाने मोठा अपघात टळला हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.कारण सकाळी पावणे नऊ वाजता हेलिकॉप्टर लँडिंग आणि 9 वाजता टेक ऑफ करणार होते. मात्र बराच वेळ ते हेलिकॉप्टर हवेतच होते. हेलिकॉप्टटरला उतरण्यासाठी बराच वेळ लागला होता. हेलिकॉप्टर खाली उतरत असताना कोसळले. यामध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे मोठा अपघात टळला असे म्हणता येईल. दरम्यान जयंत पाटील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत. अपघातानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली..www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button