
गेल्या १९ वर्षापासून बंदावस्थेत असलेल्या खेड नाट्यगृहाच्या दुरूस्ती कामाला वेग
गेल्या १९ वर्षापासून बंदावस्थेत असलेल्या कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरूस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी तब्बल साडेअकरा कोटी रुपयांचा निधी खर्चुन नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यासाठी ठेकेदाराकडून नाट्यगृहाच्या दुरूस्तीकरिता यंत्रणांची दिवसरात्र घरघर सुरू असल्याने नाट्यगसिकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. www.konkantoday.com