गुहागर, तालुक्यातील ६० बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाण्याचा खडखडाट
गुहागर, तालुक्यातील ६० बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. केवळ मोडकाआगर धरणच गुहागर तालुक्याची तहान भागवू शकते, असा अहवाल पाणीपुरवठा विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासमोर सादर केला. त्या वेळी पाणीटंचाई आहे म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणे हा पर्याय होऊ शकत नाही. समस्याग्रस्त गावात जलस्रोत वाढवण्यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी केल्या.परिक्षित यादव यांनी गुहागर पंचायत समितीमध्ये नऊ गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. कायमस्वरूपी उपाययोजना यावर मार्गदर्शन केले तसेच टंचाईमुक्त गावांची, जलजीवनच्या कामांची पाहणी केली. आढावा बैठकीच्या सुरवातीला ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मंदार छत्रे यांनी तालुक्यातील पाणीटंचाईचा अहवाल सादर केला. सध्या सडेजांभारी, शिवणे व थोपावे येथील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानवी गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ६० बोअरवेलमध्ये पाण्याचा खडखडाट आहे.www.konkantoday.com