गणेशोत्सव यंदा ७ सप्टेंबरला, कोकण रेल्वेचे आगावू आरक्षण उद्यापासून (ता.४) उपलब्ध होणार
कोकणात सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव यंदा ७ सप्टेंबरला साजरा होत आहे. यासाठी कोकण रेल्वेचे आगावू आरक्षण उद्यापासून (ता.४) उपलब्ध होणार आहे. रेल्वेचे आरक्षण १२० दिवस अगोदर होते. यंदा सात सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. कोकणातली बहुतांशी घरे बंद असतात. या प्रत्येक बंदघरामध्ये गणेश उत्सव दीड, पाच, सात किंवा ११ दिवसांपर्यंत साजरा केला जातो. त्यामुळे घराची रंगरंगोटी, साफसफाई या नियोजनासाठी चाकरमानी चार-पाच दिवस अगोदर येऊन उत्सवाची तयारी करत असतात. त्यामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे आता ४ मे पासून १ सप्टेंबरच्या प्रवासाची तिकीट रेल्वेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर सुरू होणार आहे. याच पद्धतीने पाच मे रोजी २ सप्टेंबर, सहा मे रोजी ३ सप्टेंबर, ७ मे रोजी ४ सप्टेंबर, आठ मे रोजी ५ सप्टेंबर आणि नऊ मे रोजी ६ सप्टेंबरचे आरक्षण आगाऊ उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रतिवर्षी गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्या सुरू केल्या जातात. परंतु, यंदा लोकसभा निवडणूक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यादा रेल्वे जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारण, जूनच्या अखेरीस कोकणातील गणेश उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या जाहीर केल्या जातात. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. परंतु, नियमित धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशी चाकरमानी प्राधान्याने तिकीट काढत असतात. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आता उद्यापासून आगाऊ आरक्षणाचा प्रयत्न करावा लागणार आहे.www.konkantoday.com