कोकण रेल्वे मार्गावर एकच विशेष गाडी रात्रीची धावत असल्याने कोकण रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय
उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्नसराईमुळे कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत आहेत. त्यातच मध्यरेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावरून आठवड्यातील पाच दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस-थिविम ही एकच रात्रीची विशेष गाडी चालवण्यात येत आहे. यामुळे सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. उत्तर रत्नागिरीच्या स्थानकांसाठी दिवसा धावणारी विशेष गाडी चालवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रवाशांकडून ३२२ उन्हाळी स्पेशल जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिला असला तरी सर्व फेर्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रवाशांचा रेटारेटीचा प्रवास सुरू आहे. ०१०१७/०१०१८, ०११८७/०११८८ आणि ०११२९/०११३० या क्रमांकाने कोकण मार्गावर धावणार्या गाड्या आठवड्यातून वेगवेगळ्या दिवशी धावतात. या गाड्या मुंबईतून गोव्याला जाताना रोहा येथे मध्यरात्री १.१५ वाजता माणगावात मध्यरात्री १.३६ वा. वीर स्थानकात मध्यरात्री १.४८ वा., खेड येथे मध्यरात्री २.३८ वा. चिपळूण मध्यरात्री ३ वाजता, सावर्डे मध्यरात्री ३.२० वा. तर संगमेश्वर येथे मध्यरात्री ३.३८ वाजता पोहोचतात.www.konkantoday.com