कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी सेनेचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

कोकणात कुणबी समाज मोठा आहे. मात्र त्यांना फसवण्याचे काम उबाठा गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी केले आहे, भाजपाने मात्र आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.तर महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना इथल्या कुणबी समाजाच्या प्रश्नांची जाण आहे, म्हणूनच कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी सेना या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी रत्नागिरीत केली.यावेळी कुणबी सेनेचे विकास गुडेकर, कुणबी सेना सरचिटणीस डॉ. विवेक पाटील, प्रकाश मांडवकर, भाजपचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख उमेश कुलकर्णी हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. या वेळेला कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील म्हणाले की कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारात सक्रियपणे कुणबी सेना काम करेल. कोकणामध्ये 60 ते 65 टक्के कुणबी समाज असून तो शेतीवर अवलंबून आहे. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे इथला कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतो. रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाचे अनेक बिकट प्रश्न आहेत. आतापर्यंत कुणबी समाजाने संघर्षातून आपला हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी नेहमीच लढा दिला आहे. मात्र आता समन्वयातून कुठेतरी हे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका कुणबी सेनेने घेतली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button