केंद्र शासनाच्या माध्यमातून कोकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नारायणराव राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे साहेब यांच्या प्रचारार्थ आज रत्नागिरीत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांची भव्य सभा पार पडली.मोदीजींच्या नेतृत्वात बालशाली आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून कोकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नारायणराव राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन अमित भाई शाह यांनी केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, आमदार शेखर निकम, माजी खा. निलेश राणे, आमदार नितेश राणे, किरण भैय्या सामंत, प्रमोद जठार, अजित यशवंतराव आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com