
कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
मराठ्यांना देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्यामार्फत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेला विरोध करणारे अर्जही हायकोर्टात दाखल झाले आहेत. मात्र या अर्जांची प्रत अन्य पक्षकारांना अद्याप मिळालेली नाही. ही प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही हायकोर्टानं या अर्जदारांना दिलेत.www.konkantoday.com




