उत्कृष्ट वाङ्मयास – आशीर्वाद पुरस्कार
रत्नागिरीः मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरूपात दिले जातात. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०२३ या १३ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व संबंधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचयासह संस्थेच्या ३० मेपर्यंत पाठवाव्यात. पुरस्काराच्या विचारार्थ पाठवलेली पुस्तके कोणत्याही सबबीवर परत केली जात नाहीत व निवड समितीचा पुरस्कारांचा निर्णय अंतिम असतो. यंदा आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा दिवाळीपूर्वी किंवा नंतर मुंबईत साजरा होईल. पुस्तके डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक, आशीर्वाद पुरस्कार, फ्लॅट नं. ६०४, चंद्रदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८ या पत्त्यावर पाठवा.www.konkantoday.com