
अभिनेता भरत जाधव यांना ‘पहिला भरतरत्न’ पुरस्कार
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पनेतून पार पडणारा ‘माझा पुरस्कार’ सोहळा येत्या 1 एप्रिलला दादरच्या श्री शिवाजी मंदिरमध्ये सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. पुरस्काराचे हे 16 वे वर्ष आहे.या वेळी अभिनेता भरत जाधव यांना ‘पहिला भरतरत्न’ पुरस्कार देण्यात येईल. नाटय़ शास्त्राचे प्रणेते भरतमुनी यांच्या योगदानाचा गौरव म्हणून या वर्षीपासून ‘भरतरत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे.याशिवाय सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – वैभव मांगले (‘मर्डरवाले कुलकर्णी’), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – भार्गवी चिरमुले (‘मर्डरवाले कुलकर्णी’), विशेष लक्षवेधी भूमिका – आदिती सारंगधर (‘मास्टर माइंड’), नाटय़ लेखनासाठी स्वप्नील जाधव (‘अस्तित्व’), दिग्दर्शनासाठी रणजित पाटील (‘जर तरची गोष्ट’), सर्वोत्कृष्ट अभिनेता – संकर्षण कऱहाडे (‘नियम व अटी लागू’), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – गौतमी देशपांडे (‘गालिब’), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – आशुतोष गोखले (‘जर तरची गोष्ट’), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सलोनी सुर्वे (‘अस्तित्व’) यांनाही पुरस्कार सोहळय़ात सन्मानित करण्यात येणार आहे.www.konkantoday.com