
मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजिक टेम्पोची दुचाकीला धडक, दोघे जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजिक टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाले. याप्रकरणी टेम्पोचालक चिराग राजेश आगीने (२३, रा. शिवतररोड-खेड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन वसंत कदम, नियती नितीन कदम (दोघेही रा. परशुराम-दुर्गवाडी चिपळूण) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. हे दोघे दुचाकीने (एम.एच. ०८ ए.डब्ल्यू ७४७३) जात असताना टेम्पोने (एमएच ०८ एपी ३५५०) दुचाकीला डाव्या बाजूने धडक देवून अपघात केला. या अपघातात दोघांनाही दुखापती झाल्या असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी उशिरा टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com