बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात
एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या ६ वर्षांपासून गणवेश पुरवण्यात आला नाही. २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले, मात्र ते अमान्य असल्याने पुन्हा पाठवण्यात आले.त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कोणतीही उत्सुकता दिसून येत नाही.कारण गेल्या ६ वर्षांत कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने गणवेश शिवल्याने त्या कालावधीतील खर्च एसटी महामंडळ देणार का? गणवेश कापड मिळाले तरी ते किती जोड्या मिळणार, असे प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. www.konkantoday.com