
पुरेशा प्रमाणावर पर्यटक येत नसल्याने हर्णै बंदरातील मासळीला उठव नाही
परीक्षा कालावधीमुळे रोडावलेली हर्णैतील पर्यटकांची संख्या सुट्टी कालावधीत वाढेल अशी अपेक्षा ठेवलेल्या येथील मच्छि विक्रेत्या आणि हॉटेल व्यावसायिकांची अद्यापही पर्यटक पुरेशा प्रमाणात बंदरात येत नसल्याने निराशा झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वाढती उष्णता व लोकसभा निवडणुकीसह स्थानिक सुविधांची वानवा ही मुख्य कारणे आहेत.हर्णै बंदर हे ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे. येथे आठवड्याच्या सुट्टीत पुणे, मुंबई, सातारा येथील पर्यटक नेहमी गर्दी करताना दिसतात. एप्रिल आणि मे महिन्यात बंदर पर्यटकांनी गजबजून जाते. मात्र यंदा दहावी-बारावीची परीक्षा संपल्यानंतरही हर्णै बंदरात अपेक्षित पर्यटक आलेले नसल्यामुळे येथील मच्छी विक्रेते आणि पर्यटन व्यावसायिक चिंतेत आहेत. www.konkantoday.com