कोंकण रेल्वे:- संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाला मागील आर्थिक वर्षात विक्रमी उत्पन्न; प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ! विक्रमी उत्पन्न देणा-या संगमेश्वर स्थानकात 9 ट्रेनच्या थांबा संदर्भात भावी खासदार आमच्या मागण्या पुर्ण करणार का?? :- संदेश जिमन
संगमेश्वर:- संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाने कोंकण रेल्वेला गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी उत्पन्न दिले असून प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून लांब पल्ल्यांच्या अतिरिक्त गाड्याना थांबा; स्थानकावरील दोन फलाटाना जोडणारा पादचारी पुल; तसेच कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण इत्यादी मागण्या कधी पुर्ण होणारेत असा सवाल प्रवासी विचारत आहेत. ▪️२०२३-२४ या आर्थिक वर्षात संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातुन जवळपास ६ लाख प्रवाश्यांनी प्रवास केला (येवुन जाऊन), त्यातुन कोंकण रेल्वेला ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ एवढे भरघोस उत्पन्न मिळाले. कोंकण रेल्वे सुरु झाल्यापासूनचे हे सार्वाधिक उत्पन्न आहे.▪️दरम्यान मध्यंतरी निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या गृपने पत्राद्वारे कोंकण रेल्वे प्रशासनाकडे ९ गाड्याना थांबा मिळण्याची मागणी केली होती. वास्तविक उत्पन्न मिळत असल्याने या थांब्यांचा प्राधान्याने विचार व्हायला हवा; संगमेश्वर हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे याचा विचार कोंकण रेल्वेने करुन आम्हाला थांबे द्यावेत अशी मागणी या ग्रुप चे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यानी केली आहे. आपण पाठपुरावा करत असून यश मिळेपर्यंत तो सुरुच राहिल असेही जिमन म्हणाले.*💫याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की; “जेंव्हा नेत्रावतीला गतवर्षी २२ ऑगस्ट ला नेत्रावती एक्सप्रेस चा थांबा मिळाला परंतु तोपर्यंत गणपतीचे आरक्षण झाले होते; त्यानंतरच्या काळात या गाडीने संगमेश्वरातुन चांगली कमाई केली. याचा अर्थ एकच होतो की रेल्वे प्रशासनांने मागणी केलेल्या काही गाड्याना थांबे दिल्यास येत्या वर्षभरात उत्पन्नाचा आकडा ७ कोटीच्या पार जाईल”* ▪️या गृपने रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वरसाठी एलटीटी मडगाव एक्सप्रेस, जामनगर, जबलपूर, गांधीधाम,कोचीवली, वेरावल, जनशताब्दी, तेजस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्याना थांबा मिळण्याची मागाणी केली आहे. *👉🏻 भावी खासदारांकडून अपेक्षा**💫येत्या काही दिवसांत मतदान प्रक्रिया पार पडून जून मध्ये नवनिर्वाचित खासदारांचा कार्यकाळ सुरु होईल आणि आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील आगामी काळात संगमेश्वर सारख्या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर लक्ष देवुन प्रवाशांचे होणारे हाल कमी करावेत अशी अपेक्षा प्रवासी वर्गातुन होत आहे.* ▪️छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि रत्नागिरी दरम्यान सकाळी ७:५० किंवा ११:३० या वेळेत नवीन गाडी सुरु करावी अशीही मागणी होत आहे.