
अनंत सावर्डेकर यांचा उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून गौरव
चिपळूण :: येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे चिपळूण शहर उपविभाग प्रधान तंत्रज्ञ अनंत शंकर सावर्डेकर यांचा नुकताच, मंडळ कार्यालय रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता काटकर यांच्या हस्ते उत्कृष्ठ कर्मचारी गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित परिमंडळ कार्यालय रत्नागिरी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महाव्यवस्थापक थोरात, पळसुळकर, अप्पा पाटील आदी उपस्थित होते.