
लोटे एमआयडीसीत चिकन मटणसारख्या टाकावू अवशेषांमुळे दुर्गंधी
लोटे औद्योगिक वसाहतीतील रस्त्यालगत टाकण्यात येणार्या चिकन मटण यासारख्या टाकावू अवशेषांमुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गावरील नाल्यांचा आधार घेत सर्रासपणे आवशेष टाकले जात असल्याने वाहनचालकांसह पादचार्यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. ग्रामपंचायत अथवा औद्योगिक वसाहतीतील यंत्रणेने हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. नाल्यात टाकावू अवशेष टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.एकीकडे लोटे औद्योगिक वसाहतीतील वाढते प्रदूषण ही परिसरातील ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरली आहे. बर्याचवेळा काही रासायनिक कारखान्यांमधून घातक रासायनिक सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नजिकच्या नाल्यामध्ये सोडले जाते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांकडे तक्रारी करून देखील दाद दिली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. www.konkantoday.com